For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dnyanada Ramtirthkar wedding | अप्पू'च्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री! सिनेमॅटोग्राफर हर्षदसोबतच्या लग्नाचे 'हे' खास क्षण तुम्ही पाहिले का?

05:35 PM May 10, 2026 IST | NEETA POTDAR
dnyanada ramtirthkar wedding   अप्पू च्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री  सिनेमॅटोग्राफर हर्षदसोबतच्या लग्नाचे  हे  खास क्षण तुम्ही पाहिले का
Advertisement

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dnyanada Ramtirthkar हिने अखेर तिच्या आयुष्यातील खास अध्यायाला सुरुवात केली आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ज्ञानदाने तिचा जवळचा मित्र आणि सिनेमॅटोग्राफर Harshad Atmaram याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Advertisement

8 मे 2026 रोजी दोघांनी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह केला.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. प्री-वेडिंगपासून लग्नातील प्रत्येक खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाले.

Advertisement

ज्ञानदा आणि हर्षद यांच्या लग्नातील पारंपरिक पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.लग्नासाठी ज्ञानदाने गुलाबी रंगाची आकर्षक साडी परिधान केली होती. त्यावर नाजूक दागिने आणि साधा मेकअप असा तिचा लूक अत्यंत मोहक दिसत होता.

लग्नातील पारंपरिक विधींसाठी ज्ञानदाने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.त्यासोबत पारंपरिक दागिने, हिरवा चुडा आणि नथ असा पूर्ण मराठमोळा लूक तिने केला होता.हर्षदने देखील धोतर, कुर्ता, शेला आणि टोपी असा पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहराव केला होता.
दोघांच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Advertisement
Tags :

.