For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिनेत्री डव कॅमरन विवाहबद्ध

06:08 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिनेत्री डव कॅमरन विवाहबद्ध
Advertisement

इटालियन रॉक बँडच्या डामियानोसोबत थाटला संसार

Advertisement

इटलीत एका भव्य सोहळ्यात अमेरिकन अभिनेत्री-गायिका डव कॅमरन आणि इटालियन रॉक बँड मॅनेस्किनचा फ्रंटमॅन डामियानो डेव्हिड हे विवाहबंधनात अडकले आहेत. या बहुचर्चित स्टार कपलने इटलीच्या टस्कनी क्षेत्रातील मोंटालसिनो टाउन हॉलमध्ये विवाह केला आहे. विवाहानंतर या दांपत्याची अत्यंत रोमँटिक आणि सुंदर छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या खास सोहळ्यात पारंपरिक वेडिंग गाउन किंवा टक्सीडोऐवजी दोघांनी आधुनिक फॅशनची निवड केली. 30 वर्षीय डव कॅमरनने जॉर्जियो अरमानीकडून डिझाइन करण्यात आलेला पांढरा ब्रायडल सूट परिधान केला होता, ज्यात एक सुंदर कॅप आणि बेल्ट सामील होता. तर 27 वर्षीय डामियानो डेव्हिडने क्रीम रंगाचा मॅचिंग सूट परिधान केला होता. तर त्याच्या गळ्यात रेशमी स्कार्फ होता.  जोडपे विवाहाच्या स्थळी विंटेज लांशिया फ्लेविया कन्वर्टिबल कारमध्ये सवार होत पोहोचले. या विवाहसोहळ्यात केवळ परिवाराचे सदस्य आणि काही निकटवर्तीय मित्रच सामील झाले.

Advertisement

डव आणि डामियानो यांची भेट पहिल्यांदा 2022 च्या एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्सदरम्यान झाली होती. 2023 पासून त्यांनी परस्परांना डेट करण्यास सुरुवात केली होती. यंदा जानेवारी महिन्यात दोघांनी स्वत:च्या एंगेजमेंटची अधिकृत  घोषणा केली होती.

Advertisement
Tags :

.