अभिनेत्री डेल हैडनचा संशयास्पद मृत्यू
बेडरुममध्ये भरला कार्बन मोनोऑक्साइड वायू
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ती आणि मॉडेल राहिलेल्या डेल हैडन यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. पेंसिल्वेनिया येथील घरात त्यांचा मृतदेह आढळूनआला. त्यांचा मृत्यू कार्बन मोनोऑक्साइडमुळे झाल्याचे अधिकाऱ्यांचे मानणे आहे. 76 वर्षीय डेल हैडनघराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळून आल्या.
गॅस हीटिंग सिस्टीम आणि एक्झॉस्ट पाइपमध्ये त्रुटी असल्याने कार्बन मोनोऑक्साइड वायूची गळती झाली. घरात हा वायू इतका अधिक फैलावला होता की त्याच्या संपर्कात आल्याने 2 डॉक्टर आणि एक पोलीस अधिकारी बेशुद्ध पडला. डेल हैडन यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात वोग, कॉस्मोपॉलिटन, एले आणि एस्क्वायरच्या कव्हरपेजवर झळकत जगभरात प्रसिद्धी मिळविली होती. 1973 च्या स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड स्विमसूट एडिशनमध्ये त्या दिसून आल्या होत्या.
1970-90 च्या काळात सुमारे त्या 24 चित्रपटांमध्ये दिसून आल्या, ज्यात 1994 मधील जॉन क्यूसॅकचा ‘बुलेट्स ओव्हर ब्रॉडवे’ देखील सामील आहे. डेल यांनी कन्या रयानला जन्म दिल्यावर मॉडेलिंग सोडून दिले होते. परंतु 1991 मध्ये पतीच्या मृत्यूनंतर त्यांना पुन्हा कामावर परतावे लागले होते. परंतु त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्राने त्यांना स्वीकारले नव्हते. यामुळे त्यांनी एका जाहिरात एजेन्सीत नोकरी केली होती. मग एंटी-एजिंग प्रॉडक्ट्सचा प्रचार करण्यास सुरुवात केली. त्या सोशल मीडियावर देखील अत्यंत सक्रीय होत्या. वुमेनवन नावाची संघटना त्यांनी सुरू केली होती. याचे उद्दिष्ट महिला आणि मुलींना शिक्षण उपलब्ध करविणे होते.