महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

12:52 PM Aug 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कर्करोगाशी झुंज अपयशी

Advertisement

मराठी चित्रपटसृष्टी, छोट्या पडद्यावरील मालिका आणि रंगभूमीवर बहुरंगी भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. दरम्यान विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवारातील स्मशानभूमीमध्ये दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय दत्ताराम कदम हे त्यांचे पूर्ण नाव असून 1980 च्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लहानपणी 'राजा भिकारी माझी टोपली चोरली' या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. आपल्या अभिनयाची छाप त्यांनी रसिकांवर उमटवली. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # actor Vijay Kadam passed away# mumbai # marathi filmindustry #
Next Article