'कपिल शर्मा शो'च्या या अभिनेत्यावर आली कांदे विकायची वेळ !
फोटोज् पाहता चाहत्यांना बसला धक्का
मुंबई
प्रसिद्ध कॉमेडीयन आणि अभिनेता 'सुनील ग्रोव्हर' नुकताच रस्त्यावर कांदे विकताना दिसल्याने, फोटोज खूप व्हायरल झाले आहेत.
या फोटोज् ना, "चला, आज कांद्यापासून काहीतरी बनवुया आणि चांगला काळ चालू दे अशी आशा करुया". असे कॅप्शन दिले आहे. या आधी सुनिल ग्रोव्हर बटाटे आणि भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा विकताना व्हायरल झाला होता.
सुनील ग्रोव्हर हा मुख्यतः कपिल शर्माच्या कॉमेडी शोमुळे प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने हॉलीडे, पटाखा, जवान, द गब्बर इज बॅक यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमधून अभिनयाने कौशल्य दाखविले आहे. सुनिल ग्रोव्हरला उत्तम अभिनेता आणि फाईनेस्ट कॉमेडीयन म्हणूनही नेहमी गौरविले जाते. त्याने आजवर कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये केलेल्या अनेक भूमिका खूप गाजल्या आहेत.
मध्यंतरी सुनील ग्रोव्हरचे कपिल शर्मासोबत काही मतभेद झाले होते. त्यानंतर त्याने कपिल शर्मा चा कॉमेडी शो सोडला होता. दरम्यानच्या काळात त्याने दुसऱ्या चॅनेलवर स्वतःचा कॉमेडी शो सुद्धा सुरु केला होता. त्याच्या या शोला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने तो शो बंद करण्यात आला. त्यानंतर सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यातील गैरसमज दूर झाले. आणि दोघांनी एकत्र येऊन शो करण्यास सुरुवात केली.
सध्या नेटफिक्सच्या या वर्षातील येणाऱ्या शो मध्ये 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' च्या नव्या सिझनची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये सुनिल ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकु शारदा, राजीव ठाकूर, अर्चना पुरण सिंग यांसारखे कलाकार दिसणार आहेत.