महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लैंगिक शोषण प्रकरणी अभिनेता सिद्दीकीला दिलासा

06:22 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मल्याळी अभिनेता सिद्दीकीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने लैंगिक शोषणप्रकरणी सिद्दीकीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने अभिनेत्याला स्वत:चा पासपोर्ट जमा करण्याचा आणि तपास अधिकाऱ्याला तपासात सहकार्य करण्याचा निर्देश दिला आहे. संबंधित प्रकरणी घटनेच्या 8 वर्षांनी तक्रार नोंदविण्यात आल्याची दखल न्यायालयाने घेतली आहे.

यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी न्यायालयाने याप्रकरणी अटकेपासून सिद्दीकला अंतरिम संरक्षण प्रदान केले होते. तर केरळ पोलिसांनी सिद्दीकीकडून तपासात सहकार्य केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिग्गज अभिनेता तपासात अडथळे निर्माण करत आहे. अभिनेत्याने स्वत:चे सोशल मीडिया अकौंट डिलिट करण्यासोबत इलेक्ट्रॉनिक उपकरणांना नष्ट केल्याचे केरळ पोलिसांनी स्वत:च्या अहवालात नमूद केले आहे.

तर केरळ उच्च न्यायालयाने सिद्दीकीचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज 24 सप्टेंबर रोजी फेटाळला होता. आरोपांचे गांभीर्य पाहता कोठडीत त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article