अभिनेता किरण गायकवाड झाला बांद्याचा जावई
देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर अडकले विवाहबंधनात
सावंतवाडी
ना शितली, ना जयडी, कोकणची वैष्णवी देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड याची बायडी झाली आहे. काल सावंतवाडी येथील ऐतिहासिक राजवाडा येथे दोघांचं शुभमंगल सावधान झालं आहे. मोठ्या थाटामाटात किरण आणि वैष्णवीचा शाही लग्नसोहळा पार पडला असून अभिनेता किरण गायकवाड कोकणचा जावई झाला आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिका चांगलीच गाजली. यातील डॉक्टरने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं होतं. याच मालिकेतील मुख्य अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांचा शुभविवाह गुरूवारी सावंतवाडीत पार पडला. मेहंदी, हळद, संगीत आणि काल सप्तपदी पार पडली. मालिका विश्वातील कलाकार मंडळींनी किरण आणि वैष्णवीच्या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. अभिनेता किरण गायकवाड लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी कल्याणकार ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे. याआधीही अनेक मालिकांमध्ये तीन भुमिका साकारल्या आहेत. ती मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सावंतवाडी बांदा येथे तिचं मूळ घर असून ती आता गायकवाडांची सून झाली आहे.