For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांची जयसिंगपुरात रॅली

03:08 PM May 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांची जयसिंगपुरात रॅली
Actor Govinda
Advertisement

जयसिंगपूर/प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खास . धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी सिने अभिनेते माजी खास . गोविंदा, शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी जयसिंगपूर शहरातून रॅली काढली. यावेळी रॅलीत उमेदवार खास .धैर्यशील माने, माजी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर ) सहभागी झाले हेते. रॅलीला शहरवासीयां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . तुमच्या आमाच्या कामाचा आणि हक्काचा खासदार म्हणून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी गोविंदा यांनी केले .

Advertisement

प्रारंभी सिनेअभिनेते गोविंदा यांनी आम. राजेंद्र पाटील (यड्रावकर ) यांच्या निवासस्थानी भेट दिली. आम. यड्रावकर यांनी अभिनेते गोविंदा यांचा सत्कार केला. तर त्रिशला पाटील (यड्रावकर) यांनी शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा सत्कार केला. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. स्टेशन रोडने रॅली चौथ्या गल्लीत आली. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात अभिनेते गोविंदा यांनी दर्शन घेतले. यानंतर रॅली पहिल्या गल्लीतून स्टेशन रोडने गांधी चौक मार्गे मध्यवर्ती क्रांती चौकात आली. याठिकाणी अभेनेते गोविंदा यांनी श्रीमंत जयसिंग महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर रॅली तेरावी गल्ली, जुनी भाजी मंडई, नगरपालिका रोडने राजीव गांधीनगरमध्ये आली. यानंतर रॅलीची सांगता झाली. रॅलीत शरदचे संचालक आदित्य पाटील, राहुल पाटील, संभाजी मोरे, दादासो पाटील, प्रकाश लठ्ठे, राहुल बंडगर, महेश कलकुटगी, अभिजीत भांदिगरे, प्रविण इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.