नाट्याकर्मी, नाट्या दिग्दर्शक प्रदीप वेर्णेकर यांचे निधन
प्रतिनिधी/ पणजी
गोमंतकीय सुप्रसिद्ध नाट्याकर्मी, नाट्या दिग्दर्शक आणि नाट्या समीक्षक प्रदीप वेर्णेकर यांचे दीर्घ आजारानंतर शनिवारी रायबंदर येथे निधन झाले.
प्रदीप वेर्णेकर यांनी अनेक मराठी नाटकांसाठी दिग्दर्शन केलेले होते. एखादे नाटक बसविताना ते शास्त्रशुद्ध पद्धतीने अफाट कष्ट घेत नाटकाची निर्मिती करीत होते. नवी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी नाट्याचा अभ्यास केला व तिथून त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने नाट्यानिर्मितीचा प्रवास सुऊ झाला. गोवा सरकारने इ. स. 2016 मध्ये त्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
आपली वर्ग मैत्रिण दिप्ती हिच्याशी विवाहबद्ध झालेले प्रदीप वेर्णेकर यांनी गोवा कला अकादमीच्या स्कूल ऑफ ड्रामामध्ये अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ झाला. भारतीय शास्त्रीय परंपरेतील नाटकांचे दिग्दर्शन करणे अत्यंत कठीण बाब. अशी कठीण नाटके उचलून त्या नाटकांचे दिग्दर्शन हा त्यांचा हातखंडा होता.