अभिनेता दर्शन जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात
11:50 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी कारागृहात असलेल्या कन्नड अभिनेता दर्शन याने जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साक्षीदारांच्या चौकशीला विलंब होत आहे. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती दर्शनने केली आहे. दर्शनने यापूर्वी जामिनासाठी दोन वेळा उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्याच्या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने आता सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदर याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध होण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
Advertisement
Advertisement