For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Arbaz Shaikh | 'सैराट' फेम सल्याच्या मदतीला धावले शिंदे सरकार! उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून १ लाखांची आर्थिक मदत

12:30 PM Jul 12, 2026 IST | NEETA POTDAR
arbaz shaikh    सैराट  फेम सल्याच्या मदतीला धावले शिंदे सरकार  उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून १ लाखांची आर्थिक मदत
Advertisement

मुंबई -सैराट' चित्रपटात 'सल्या'ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख गेले बऱ्याच दिवसापासुन चर्चेत आहे.. नुकताच सोशल मिडीयावर सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलच्या गलिच्छ कारभाराविरोधात व्हीडीओ केला होता , त्याचा हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता त्याच्या या व्हीडीओची दखल अन्न - औषध आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतली होती, त्यांनी नोबेल हॉस्पिटलवर कारवाई देखील केली होती..

Advertisement

आता तुकाराम मुंडे यांच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दखल घेतली आहे.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्यानंतर अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचाराकरिता सोलापुरातील वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी पुढाकार घेतल्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अभिनेता अरबाज शेखला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीचा धनादेश नुकताच त्यांनी अरबाज शेखला सुपूर्द केला...

मराठी अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांना मेंदूचा आजार झाल्याने त्यांना सोलापूरचा नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, या रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप केला होता... त्यांने या संदर्भातील माहिती सोशल मिडीयावर व्हीडीओ पोस्ट करुन दीली..त्याने त्यामध्ये त्याच्याकडे एवढे पैसे नाहीयेत, त्याला मदत करावे असे आवाहन फॅन्सना केले होते..

Advertisement

यामुळे याची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आज सकाळीच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती.

यावेळी त्यांनी वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत, मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजच्या वडिलांच्या उपचारासाठी तातडीने 1 लाख रुपयांचा धनादेश त्वरित अरबाजकडे सोपवला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि दातृत्वाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.