Amitabh Bachchan Praised Vaibhav Suryvanshi 15 वर्षीय वैभव सुर्यवंशीचे फॅन झाले बिग बी, म्हणाले या वयात तर आम्हाला....
IPL च्या यंदाच्या हंगामात एका किशोरवयीन फलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या वैभव फुल फॉर्ममध्ये असणारा खेळाडू म्हणून सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. या हंगामातील आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रवास शुक्रवारी संपला असला तरी, वैभवने आपल्या आक्रमक फलंदाजीने उमटवलेला प्रभाव क्रिकेट चाहत्यांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाईल.
बिग बींवर वैभवचा प्रभाव
आपल्या आक्रमक फलंदाजीने वैभवने सर्वांनाच आपल्या बॅटचे फॅन बनायला भाग पाडले आहे. अनेक सेलेब्रिटींकडून त्याचं कौतुक होत असताना आता त्यात महानायक अमिताभ बच्चन यांची भर पडली आहे. बिग बींनीही सोशल मिडीयावर पोस्ट करत वैभवचं कौतुक केलं आहे.
आम्हाला या वयात
शुक्रवारी रात्री उशिरा, अमिताभ यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी लिहिले, "सूर्यवंशी - १५ वर्षांचा, अप्रतिम सूर्या. या वयात आम्हाला बंटे आणि गुल्ली-दंडासुद्धा नीट खेळता येत नव्हते!!" वैभवला इतक्या लहान वयात अमिताभ बच्चन यांच्यासारख्या स्टारकडून प्रशंसा मिळणे ही वैभवसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
वैभवने अनेकांचे विक्रम मोडले.
वैभवने यावर्षीच्या आयपीएलमध्ये अनेक विक्रम रचले. त्याने एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा महान ख्रिस गेलचा आयपीएल विक्रमही मोडला. संपूर्ण हंगामात असे अनेक सामने होते, ज्यात केवळ वैभवच्या बॅटने राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. वैभवने जसप्रीत बुमराह आणि मिचेल स्टार्कसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचेही धाबे दणाणून सोडले होते.
राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचता आले नाही.
वैभव सूर्यवंशीने या हंगामात १६ सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या असल्या तरी, राजस्थान रॉयल्स अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. शुक्रवारी गुजरात टायटन्सकडून सामना गमावल्यानंतर वैभव मैदानावर रडू लागला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.