For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ - कविलकाटे येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

03:58 PM Nov 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ   कविलकाटे येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळला उद्धव बाळासाहेब ठाकरे ( उबाठा) शिवसेनेला शिंदे शिवसेनेने धक्का दिला. उबाठा शिवसेनेचा समजला जाणारा कुडाळ शहरातील कविलकाटे हा बालेकिल्ला अखेर ढासळला. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, तुम्हाला देऊ तो शब्द पूर्ण करू.त्यांना दहा वर्षे दिली आपल्याला फक्त अडीज वर्षे द्या. हा मतदारसंघ आदर्शवत बनविल्याशिवाय राहणार नाही, असे महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांनी सांगितले.कुडाळ शहरातील कविलकाटे हा भाग गेली कित्येक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या प्रभागात अन्य पक्षाला कोणतेही स्थान नव्हते. माजी सभापती स्व.बाळा जळवी यांनी हा बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. मात्र, उबाठा शिवसेनेच्या बालेकिल्यात शिंदे शिवसेनेने धक्का दिला. स्व.बाळा जळवी यांच्या निवासस्थानी उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नीलेश लेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. बाळा जळवी यांच्या प्रतिमेला महायुतीचे उमेदवार श्री राणे यांनी पुष्पहार अर्पण केला. शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, विश्वास गावकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, सरस्वती जळवी, शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर व बंटी तुळसकर आदि उपस्थित होते.  नीलेश राणे म्हणाले, गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ दुर्लक्षित झाला आहे. मात्र, येत्या अडीज वर्षात मतदार संघ आदर्शवत बनविल्या शिवाय राहणार नाही. तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला. ही कौतुकाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. या विकास प्रक्रियेत तुम्हाला कुठेही दुरावले जाणार नाही, असे सांगितले. कविलकाटे नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. गेल्या दहा वर्षात या रस्त्याची अवस्था खडतर झाली आहे. पुराचे पाणी येत असल्यामुळे वाहतूक ठप्प होते. या सर्व गोष्टी गेल्या दहा वर्षापासून रखडल्या.याकडे तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रवेशकर्त्यांमध्ये काँग्रेसच्या रंजना जळवी, तर उबाठा शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिक बाळा पेडणेकर, संतोष साळगावकर, अमित उर्फ चिंक्या जळवी, नीलेश जळवी, सुवर्णा पेडणेकर, राजाराम गडेकर, रवी जळवी, गणपत हरमलकर, राहुल जळवी, आदिती जळवी, वनिता जळवी, दत्ताराम जळवी, दीपक जळवी, प्रसाद जळवी, अहिल्या जळवी, दिपाली जळवी, साहिल जळवी, वैभव जळवी, सदानंद साळगावकर, सोनाली साळगावकर, विष्णू साळगावकर, राजेंद्र जळवी, निलेश रमेश जळवी, शिवाजी जळवी, सुभद्रा जळवी, नंदा जळवी, गोपिका जळवी, कृष्णा जळवी, गजानन जळवी,रमेश जळवी, रेणुका जळवी, आनंद साळगावकर, दिव्या जळवी, केशव जळवी, रिया गडेकर, सत्यवान जळवी, सत्यवती जळवी, रोहन जळवी, चैतन्य बावकर, कृतिका रुपेश सरंबळकर, श्रद्धा सरंबळकर, वैभवी तारी, सिद्धेश जळवी, सिद्धी जळवी, मनीषा पाटकर, दर्शना मातोंडकर आदींनी प्रवेश केला. सूत्रसंचालन राकेश कांदे यांनी, प्रास्ताविक आनंद अणावकर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.