आडवलीत ठाकरे शिवसेनेला धक्का
मसूरे प्रतिनिधी
शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे यांच्या उपस्थितीत आडवली मालडी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील लाड , माजी ग्रा. प. सदस्य सीमा घाडीगावकर,भिकाजी घाडीगावकर,संदेश घाडीगावकर,दाजी घाडीगावकर,मंगेश पराडकर , जितेंद्र तावडे यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यां सहित जाहीर प्रवेश झाला.ठाकरे गटाचा आडवली हा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता.गेल्या दहा वर्षात येथील काहीच विकास झाला नाही आणि या साठीच या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला असे या वेळी बोलताना या सर्व प्रवेश कर्त्यानी सांगितले.निलेश राणे यांना गावा गावातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात फक्त शिवसेना हाच पक्ष विकास करू शकतो. याची जाणीव जनतेला झाली आहे. या वेळी ५० हजार पेक्षा जास्त मताधिक्य निलेश राणे यांना मिळणार असल्याचा दावा शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे यांनी या वेळी बोलताना केले. महायुतीचे उमेदवार श्री निलेश राणे यांना मोठे मताधिक्याने आडवली मालडी गावातून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर ,आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, विजय घाडीगावकर, धनाजी घाडीगावकर, विलास , भगवान लाड , सौ. स्नेहा घाडीगावकर, मालडी गावचे शाखा प्रमुख दशरथ पराडकर, युवा शाखा प्रमुख उमेश साटम, सतीश कदम व इतर शिवसैनिक उपस्थित होते.