For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेमळेतील ५० कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

04:03 PM Nov 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
नेमळेतील ५० कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

आमच्या गावाचा विकास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरच करू शकतात. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत. श्री केसरकर यांना गावातून सर्वाधिक मतदान दिले जाईल असा विश्वास नेमळे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिला . नेमळे तुळसकर वाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील महिला, पुरुष व युवकांसह ५० जणांनी मंत्री दिपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत कविटकर यांच्या हस्ते या सर्व शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. यात महिला उपविभाग शाखाप्रमुख दिव्या वायंगणकर, श्री दिगंबर वायंगणकर उपशाखा प्रमुख विजय तुळसकर यांच्या पुढाकाराने हा प्रवेश घेण्यात आला .

यावेळी महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत कविटकर म्हणाल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे . आज महिला सन्मानाने जगत आहेत. महिलांसाठी विविध उद्योग व्यवसायाला चालना रत्नसिंधू योजनेतून श्री केसरकर यांच्या माध्यमातून मिळत आहे. निश्चितपणे गावाचा विकास केसरकर यांच्या माध्यमातूनच सुरू आहे. तुम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तुमचा सन्मान राखला जाईल. श्री केसरकर यांना मोठ्या मताधिक्याच्या फरकाने आपल्याला विजयी करायचे आहे.त्यामुळे सर्वांनी प्रत्येक घराघरात ,गावागावात जाऊन विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा असे स्पष्ट केले.

Advertisement

यावेळी. सावंतवाडी युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर ,चेतन गावडे ,दिनानाथ वायंगणकर , तळवडे विभाग प्रमुख चैत्राली गावडे उपस्थित होते. यावेळी श्रद्धा तुळसकर ,समीक्षा तुळसकर, विभा तुळसकर.. ,आनंदी तुळसकर. ,विनंती तुळसकर., संजना तुळसकर ,चैताली तुळसकर, श्वेता तुळसकर., जानकी तुळसकर., शैलजा तुळसकर. प्रणाली शिरोडकर ललिता शिरोडकर. अपूर्वा तुळसकर,, अशोक तुळसकर. ,अनिल तुळसकर .. ,अक्षय शिरोडकर. ,अमित शिरोडकर, अमित शिरोडकर ,लक्ष्मण शिरोडकर,. रवींद्र तुळसकर, संतोष तुळसकर, निलेश तुळसकर ,विनय तुळसकर ,सागर तुळसकर ,दत्तप्रसाद तुळसकर, अमित शिरोडकर. ,प्रकाश तुळसकर., स्वप्निल तुळसकर ,सहदेव तुळसकर ,महादेव रेडकर ,प्रभाकर रेडकर ,सुभाष तुळसकर ,ओंकार तुळसकर, विवेक शिरोडकर वैभव शिरोडकर ,आदींनी प्रवेश केला

Advertisement
Tags :

.