कागलमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
साखर -पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
कोल्हापूर
कागल - गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ यांचा आज मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा नागपूर येथे झाला. राज्याच्या मंत्रीमंडळात आमदार हसन मुश्रीफ यांना नवव्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली. कार्यकर्त्यांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी व साखरपेढे वाटप करत हा आनंदोत्सव साजरा केला.
येथील गैबी चौकात हसन मुश्रीफ यांच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथविधी सोहळा लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले
यावेळी कागलचे ग्रामदैवत हजरत गहिनीनाथ गैबीपिरास गलेफ अर्पण करण्यात आला. तसेच गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, प्रकाश नाळे, प्रविण काळबर, अमित पिष्टे, अस्लम मुजावर, संजय ठाणेकर, संजय फराकटे, इरफान मुजावर, शानुर पखाली, विवेक लोटे, संजय चितारी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .