For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कै.वाय.डी.पाटील गटाला यशवंत बँक निवडणूकीत डावलल्याने कार्यकर्ते नाराज

10:49 AM Dec 21, 2023 IST | Kalyani Amanagi
कै वाय डी पाटील गटाला यशवंत बँक निवडणूकीत डावलल्याने कार्यकर्ते नाराज
Advertisement

उत्रे प्रतिनिधी

Advertisement

यशवंत बँकेचे पॅनेल निवड करताना दोन्ही पँनेलने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व पन्हाळ्याचे माजी सभापती कै. वाय.डी.पाटील गटाकडे दुर्लंक्ष केले.वार्षिक सभेत सडेतोड प्रश्न मांडण्याची भुमिका व बँकेने स्वच्छ कारभार करण्यासाठी असणारा अट्टाहास हा स्वभाव दोन्ही पॅनेलला पचणी पडत नसल्यानेच अन्याय केला असल्याचे दिसून येतयं.कोणतीही सत्ता नसताना शेकडो कार्यकर्ते आजही पाठिशी आहेत. वाय.डी.पाटील गटावर प्रेम करणारे पन्हाळा तालुक्यात हक्काचे ७१३ मतदान असून शाहुवाडी व करवीरमध्ये देखील गटाची मोठी ताकद आहे.आमच्या गटाकडील मतदान सहजपणे एखादया पँनेलला विजयी करू शकते एवढी ताकद आहे.दरम्यान दबाव गट तयार करण्यासाठी तिसरे पॅनेल करण्याचा अनेकांनी सल्ला दिला मात्र स्वतंत्र पँनेल करून वाद निर्माण करणे ही वाय. डी. पाटीलांची संस्कृती नसल्याचे अँड विजयसिंह पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

कुडीत्रे येथील यशवंत बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या रविवारी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.मात्र बँकेच्या निवडणूकीत बँकेचे संस्थापक उत्रे गावचे दिवंगत लोकनेते वाय.डी.पाटील यांच्या वारसांना दोन्ही गटाने उमेदवारी डावलली असल्याने दिवंगत वाय.डी.पाटील यांच्यावर प्रेम करणार्‍या गटाने भूमीका स्पष्ट करण्यासाठी उत्रे येथे अँड.विजयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते.याविषयी दोन दिवसात निर्णय स्पष्ट करून लवकरच निर्णय जाहिर करणार असल्याचे अँड.विजयसिंह पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

Advertisement

यशवंत बँकेच्या निवडणुकीत वापरा अनं फेका नितीमुळे संस्थापकांच्या वारसावर अन्याय, दोन दिवसात भूमीका स्पष्ट करणार असल्याचे अँड.विजयसिंह पाटील यांचे पत्रकार बैठकीत मत केले. तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांच्या सहकार्यातून पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावचे दिवंगत लोकनेते वाय.डी.पाटील यांनी पन्हाळा,शाहुवाडी,करवीर तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर यांना अर्थिक व्यवहार करण्यासाठी फायदयाचे ठरण्यासाठी सहकार्‍यांना सोबत घेऊन कुडीत्रे इथं यशवंत बँकेची स्थापना केली.बँकेच्या माध्यमातून परिसरातील हजारो लोकांच्या गरजा निघाल्या मात्र अलिकडच्या राजाकारणातील वापरा अनं फेका हि निती घातक असून संस्थापकांच्या वारसांच्या बाबतीत देखील घडत असल्याने खेद निर्माण होत असल्याचे कोल्हापूर बार असो.उपाध्यक्ष वाय.डी.पाटील यांचे पूत्र अँड.विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत खदखद व्यक्त केली.

कार्यकर्त्याची मते आजमावण्यासाठी आयोजित मेळाव्यात बोलताना भविष्यात काम करण्यासाठी जे पँनेल आमच्या गटाला संधी देईल त्या पँनेलला सहकार्य करणार असल्याचे सांगून दोन दिवसात निर्णय जाहिर करणार असल्याचे अँड.पाटील यांनी सांगितले. दरम्यान सांगरूळचे उत्तम कासुटे यांनी अँड.विजय पाटील हे सडेतोड भांडून चुकीच्या कारभाराचा भांडेफोड करत असल्यानेच त्यांना लांब ठेवले जात असल्याचे सांगून अशा स्वच्छ माणसाची बँकेच्या उज्वल भविष्यासाठी गरज असल्याने वकील जो निर्णय देतील तो आम्ही पाळणार असल्याचे यावेळी मनोगतातून भावना व्यक्त केली.दरम्यान विष्णू नांगरे,संभाजी साबळे हिंदुराव चव्हाण,शरद पाटील,राजेंद्र पाटील,महादेव चेचर यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा असल्याचे जाहिर केले.

यावेळी के.एम.पाटील,अरूण पाटील,पोपट पाटील,शामराव नांगरे,अदिनाथ बंगे,तातोबा गायकवाड,दिपक पाटील,रवि चौगले तसेच परिसरातील मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.