For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करा

12:17 PM Jan 09, 2025 IST | Radhika Patil
बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करा
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

सलग सुट्या आणि शैक्षणिक सहलीमुळे शहर वाहतुकीची कोंडी होवून, रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत आहे. अशातच बंद ट्रॅफिक सिग्नलमुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे. त्याचबरोबर शहराच्या प्रदूषणातही भर पडत आहे. या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे याच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत शहरातील बंद सिग्नल यंत्रणा त्वरीत कार्यान्वित करण्याबाबतच्या सुचना दिल्या.

आमदार महाडिक यांनी बैठकीत शहरातील अनेक सिग्नल बंद का आहेत ? अशी विचारणा करीत, ज्या ठिकाणी वीज पुरवठा अथवा तत्सम समस्यांचा सामना करावा लागतो. त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घ्या. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करा. तो प्रस्ताव शासनाकडून मंजूर कऊन, यासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर शहरातील काही सिग्नल्सवर वाहतुकीला अडथळा होईल, अशा रितीने अतिक्रमण झाले आहे. अशी अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने कारवाई कऊन, अतिक्रमणे हटवावी. शहर वाहतूक शाखेकडे असलेली बहुतांश बॅरिकेट्स जीर्ण आणि मोडकळीस आलेली आहेत. त्या बॅरिकेटची दुरुस्ती आणि रंगकाम महाडिक उद्योग समूहातर्फे केले जाईल असेही आमदार महाडिक यांनी सांगितले.

Advertisement

  • पाहणे औत्सुक्याचे ठरेल

शहरातील पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारल्यास होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. आमदार महाडिक यांच्या बैठकीनंतर तरी शहरातील सिग्नल यंत्रणेत सुधारणा होते का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली.

Advertisement
Tags :

.