For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक मॉडेल 27 रोजी बाजारात

06:18 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक  मॉडेल 27 रोजी बाजारात
Advertisement

पूर्ण चार्जवर 100 किमी अॅक्टिव्हा धावणार

Advertisement

नवी दिल्ली :

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ही कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, कंपनीकडून 27 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात येणार आहे, की जी  ई-अॅक्टिव्हा असू शकते. होंडाने पाठवलेल्या लाँचच्या निमंत्रणावर ‘व्हॉट्स अहेड’ आणि ‘लाइटनिंग बोल्ट’ असे घोषवाक्य आहे.

Advertisement

कंपनीचे म्हणणे आहे की ही स्कूटर अॅक्टिव्हा 110 सारखी शक्तिशाली असेल आणि एका चार्जवर 100 किमीची रेंज मिळेल. हे स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह लॉन्च केले जाईल. कंपनीने अलीकडेच इटलीतील मिलान येथे इआयसीएमए ऑटो शोमध्ये आपल्या मॉडेलचे अनावरण केले. लॉन्च केल्यानंतर, ते टीव्हीएस आयक्युब, अॅथर 450 एक्स, बजाज चेतक आणि ओला एस1 यांच्यासोबत स्पर्धा करणार आहे.

Advertisement
Tags :

.