भेसळयुक्त, मुदतबाह्य पदार्थ आढळल्यास जागीच कारवाई
कोल्हापूर :
काहीवेळा छुप्या मार्गाने भेसळयुक्त व मुदतबाह्य विविध खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे अनेकदा आढळून येते. जिल्ह्यात हजारो केक उत्पादक व बेकरी व्यावसायिक आहेत. विविध प्रकारच्या मिठाई व खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या पटीत आहे. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे विशेष पथकाकडून कारवाई सुरू असली तरी काहीवेळा तिथेपर्यंत पोहचणे शक्य होत नसते. अन्न व औषध सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे म्हणाले, योग्यरीत्या स्टोअरेज न केलेले बेकरी व केक उत्पादने, कोणतही मुदत बाह्या पदार्थ, शिळे अन्न, अस्वच्छ खाद्यपदार्थ, भेसळयुक्त मिठाई, बंदी असलेले रासायनिक पदार्थ वापरून केलेली उत्पादनांचे सेवन केल की त्यापासून विषबाधा व पोटाच्या तक्रारीसह जीवावर बेतू शकते. अशा पदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशसनाकडून तपासणी करून कार्यवाही करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, याला पुर्णपणे प्रतिबंध व आळा घालण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. बेकरीतील केक असो किंवा अन्य कोणतेही खाद्यपदार्थ असो त्याची मुदत व दर्जा पाहूनच नागरीकांनी खरेदी केली पाहीजे, असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोषींवर कडक कारवाई
केक, बेकरीसह कोणत्याही खाद्यपदार्थात भेसळ करण्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाडून तपासणी सुरू आहे. कागल तालुक्यातील चिमगाव येथे केकमधुन विषबाधा झालेल्या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाने केकचे नमुने तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. त्याची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. पोलिसांकडूनही योग्य दिशेने तपास सुरू आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात यावर्षी 25 जणांवर कारवाई
ते म्हणाले, जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाडी टाकून खाद्यपदार्थांची तपासणी केली आहे. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत 25 विक्रेत्यांकडे मुदत बाह्या, खराब, नियमबाह्या पदार्थ आढळून आले आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाईचा धडाका सुरू राहणार आहे. यासाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक आहे.
कुठल्याही खाद्यपदार्थांची खरेदी करताना नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. उत्पादक व विक्रेत्यांनीही शासनाच्या नियमानूसार पदार्थामध्ये समाविष्ट केलेल्या घटकांची माहिती सविस्तर देणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने औषधाची एक्सपायर डेट पाहीली जाते त्याचप्रमाणे ग्राहकांनीही खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट पहावी. यात त्रुटी आढळल्या तर थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
शोकेसमध्ये ठेवलेल्या केकची तपासणी करणार
जिल्ह्यातील अनेक बेकऱ्यांमध्ये तयार केलेले आईस केक, कप केक, खाद्यपदार्थ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काचेच्या शोकेसमध्ये ठेवले जातात. काहीवेळा ते निकृष्ठ असल्याचे आढळले जातात. याची जागोजागी जाऊन तपासणी करण्याची माहीत अधिक तीव्र केली जाणार आहे. त्याच बरोबर काही केकची नियमावली न दर्शविता विक्री केली जाते. अशा विक्रेत्यांचीही तपासणी करून संशयास्पद आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केकमध्ये बंदी असलेले घटक वापरल्यास कारवाई
अनेकदा केकमध्ये चकाकी व चमकदार रंग दिसण्यासाठी शासनाने बंदी घातलेले घटक वापरत असल्याच्या तक्रारी आहेत. याची तपासणीही सुरू आहे. उत्पादकांनी नियमानुसारच घटक वापरावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. आईस केक तीन दिवसाच्यावर विक्रीसाठी ठेवू नये. अशा विक्रेत्यांवर तपासणीची मोहीम सुरू आहे. स्टॅबेलायजरसह अनेक घातक घटक बंदी असताना केकमध्ये वापरू नयेत.