For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांगेली धबधब्यावर येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करणार

12:24 PM Jun 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मांगेली धबधब्यावर येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करणार
Advertisement

फणसवाडी येथील भाजपच्या बैठकीत ठराव

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर
फोटो – समीर ठाकूर

पर्यटकांना भुरळ घालणारा दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा आणि त्या ठिकाणची सुरक्षा या संदर्भात मांगेली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने बैठक घेण्यात आली. धबधब्याच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढण्यासोबत पर्यटनाला कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी काही ठोस उपाययोजनांची चर्चा देखील या बैठकीत करण्यात आली. गावातील फणसवाडी येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मांगेली मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्याचबरोबर काही मद्यपी यांची देखील संख्या वाढत असून दिवसेंदिवस लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. काही मद्यपी भररस्तावर दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसतात. याचा त्रास तेथील स्थानिक लोकांसोबत मांगेलीकडे ये – जा करणाऱ्या पर्यटकांना देखील होतो आहे. तेथील स्थानिक लोकांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक गवस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने काल रविवारी मांगेली – फणसवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत आदी उपस्थित होते. स्थानिक लोकांच्या अडचणी समजून पोलिसांमार्फत हुल्लडबाजी करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे पोलिस उपनिरीक्षक भगत यांनी सांगितले. व याच्या पुढे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेऊन प्रत्येक गाडीची तपासणी करणार असे सांगितले. पोलिसांची जास्त फौज मागवून योग्य तो बंदोबस्त करून कोण चुकीचा वागत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यावेळी कसई – दोडामार्ग नगराधक्ष चेतन चव्हाण यांनी रोजगार संदर्भात मार्गदर्शक केले कर्नाटक येथील दांडेली च्या पार्श्वभूमीवर पर्यटन येथे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करू तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाला आपले सहकार्य राहील असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, मांगेली येथील तलाठी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, मांगेलीचे उपसरपंच कृष्णा गवस, सुनील गवस, गुरुनाथ गवस, पिकी कवठणकर कृष्णा गवस, पांडुरंग गवस, गुणाजी गवस, आनंद गवस, शंकर गवस, चंद्रकांत गवस, एकनाथ गवस, रामा गवस, अर्जुन वर्णेकार, तुकाराम गवस, सुनील गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.