अखेर वाल्मिक कराडवर मोक्का
Walmik karad l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का?
वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. सीआयडीला सरपंच संतोष देशमुख खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. मात्र त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी मागणी CID ने केली आहे. मात्र आता मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
सध्या वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र सरपंच संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे वाल्मिक कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास CID ला करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.