मोबाईलवर ऑनलाईन मटका घेतल्याप्रकरणी एकावर गुन्हा
धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड परिसरात कारवाई
मालवण/प्रतिनिधी
मालवण बोर्डिंग ग्राऊंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊस मध्ये ऑनलाईन मोबाईलवर मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका संशयित व्यक्तीकडून तब्बल 31 हजार 570 रुपयांचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दिनकर दाजी खोबरेकर (51 रा. धुरीवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये एक मोबाईल, एक प्रिंटर, रोख रक्कम, बँकेचा एक स्कॅनर आणि आकडेमोड करण्यात आलेल्या पावत्या जप्त करण्यात आले आहेत. खोबरेकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मटका जुगाराचे आकडे मोबाईल वर ऑनलाईन घेऊन आणि पैसे प्रत्यक्ष व स्कॅनर द्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माने, जितेंद्र पेडणेकर, सुशांत पवार, महादेव घागरे, गुरुनाथ परब, मनोज कांबळे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जे. एस. कुडाळकर हे करीत आहेत.