For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी वाहनावर ‘पोलिस फलक’ लावल्याप्रकरणी कारवाई

07:58 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासगी  वाहनावर ‘पोलिस फलक’ लावल्याप्रकरणी कारवाई
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

खासगी वाहनावर ‘पोलिस’ असा फलक लाऊन गोव्यात फिरणाऱ्या भुरट्या पोलिसांवर पर्वरी पोलिसांनी कारवाई केली. महाराष्ट्रातील पर्यटकांनी त्यांच्या खासगी वाहनावर ‘पोलिस’ असा फलक बेकायदेशीरपणे वापरल्याबद्दल त्या पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना भारतीय न्याय संहिताच्या कलम 35 अंतर्गत अटक करण्यात आली. नंतर त्यांना म्हापसा येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले आणि नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 2 जानेवारी रोजी, पर्वरी परिसरात एमएच-12-एलपी-5689 क्रमांकाची एक ह्युंडाई वेर्णा गाडी संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. वाहनावर ‘पोलिस’ असा फलक होता. वाहनचालक कॉन्स्टेबल  बाबुराव शिरोडकर आणि हवालदार धर्मेंद्र वाडकर यांच्यासह गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर वाहनाला थांबवले आणि वाहन ताब्यात घेतले. चालकासह प्रवाशांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीनंतर असे दिसून आले की, सर्व प्रवासी खासगी सेवेत होते आणि त्यांचा पोलिस विभागाशी कोणताही संबंध नव्हता. त्यांनी पोलिस तपासणी टाळण्यासाठी ‘पोलिस” असा फलक लावल्याचे कबूल केले

Advertisement

Advertisement
Tags :

.