Solapur News : बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पंढरपुरात कारवाई
स्टेशन रोडवर वेड्यावाकड्या वाहनतळामुळे नागरिक त्रस्त
पंढरपूर : येथे स्टेशन रोड भागातील वाईन शॉपसमोर वेड्यावाकड्या पद्धतीने लावलेल्या वाहनावर कारवाई करून वाईन शॉप मालकास पोलिसांकडून समज देण्यात आली. वाढत्या थंडीमुळे स्थानिक लोक गारठून जात आहेत. यामुळे देशी-विदेशी मद्याची विक्री चांगलीच वाढली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील स्टेशन रोड भागात असलेल्या एका वाईन शॉपमुळे मद्यपीची गर्दी वाढत असून हे ग्राहक दारू विकत घेण्यासाठी जाताना वेडचावाकडचा पद्धतीने गाड्या रस्त्यावर लावून जात आहेत. यामुळे शहरातून उपनगरामध्ये जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर वारंवार. आल्यावर शहर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल पोलिसांनी दखल घेऊन अशा ग्राहकांवर कारवाई केली आहे. तसेच दुकान मालक यांना बाहेर बोलावून, योग्य शब्दात समज दिलीही कारवाई शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी केली असून बेजबाबदार पार्किंग करणाऱ्या मद्यपी ग्राहकांना चांगलीच चपराक दिली आहे. अनेकदा मोठी चारचाकी वाहने उभी करून
लोक दारू विकत घेण्यासाठी जातात. त्यामुळे निम्मा रस्ता अडतो.महिला आणि मुलींना येथून जाताना मद्यपी लोकांच्या विकृत नजरेचा सामना करावा लागतो. नागरिकांना मद्यपी लोकांची दादागिरी, उद्धट वर्तन सहन करावे लागते. अनेकदा गाडीचा धक्का लागतो, तक्रार केल्यास उलट त्यांचीच अरेरावी सहन करावी लागते. याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने गद्यपी दुचाकी चालक व दुकान मालक यांच्यावर कारवाई केली.