कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवणात रत्नागिरीतील दोन एल.ई.डी.नौकांवर कारवाई

04:26 PM Apr 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात रत्नागिरी येथील हाजि जावेद नों. क्र.- IND-MH-४-MM-५८४३ व YM-मातिन-H-इस्माईल नों. क्र.- IND-MH-४-MM-५४०९ या नौका अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटव्दारे मासेमारी करत असताना आढळल्या असून या दोन्ही नौकांवर कारवाई करण्यात आली. दिनांक १६ एप्रिल रोजी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. रविंद्र ग. मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, हे गस्त घालत होते यावेळी ही नौका आढळून आली . या नौकेवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत.सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर नौकांना ५ ते ६ लक्ष दंड होण्याची शक्यता आहे.अंमलबजावणी अधिकारी श्री. रविंद्र ग. मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी श्री. हरमलकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे . अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article