Shirol News : नांदणी येथे जनावरांचे मास वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई; 16 लाख रुपयाचे मुद्देमाल जप्त
शिरोळ तालुक्यात चार टन मांसाची वाहतूक उघडकीस
नांदणी: नांदणी, ता. शिरोळ येथे जनावरांचे मांस बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रकावर रविवारी दुपारी कारवाई करून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे जनावरांचे मास चार टन व ट्रक असा १६ लाख रुपयाचा मध्यम आल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आयुब मौला जमादार (वय ३६ रा.जवाहरनगर इचलकरंजी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसातून मिळालेले अधिक माहिती अशी, नांदणी येथून ट्रक मध्ये निळ्या रंगाच्या कॅरेटमध्ये जनावरांचे मास भरून देण्यात येत होते. येथील स्थानिक नागरिकांच्या त्यांनी ट्रक अडवून याबाबत शिरोळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नांदणी येथे चार चाकी टाटा मोटर ट्रक (क्र. एम एच ४३ बीपी ४९६२) या ट्रकवर कारवाई करून सुमारे चार टन जनावरांचे मास निळ्या रंगाच्या कॅरेटमध्ये भरून येत असल्याचे आढळले.
मास वाहतूक करताना त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ना आढळल्याने सुमारे ११ लाख रुपये किमतीचे जनावरांचे मास व ५ लाख रुपये किमतीचे ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी इचलकरंजीच्या या याकूब जमादार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद प्रल्हाद लक्ष्मण आंबी (वय ५९ रा. नांदणी ता. शिरोळ) यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर करीत आहेत.