For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्यमबाग रोडवर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई

07:32 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्यमबाग रोडवर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई
Advertisement

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना सततचा त्रास

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

उद्यमबाग-बेळगाव रस्त्यावर दररोज सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी तिसरे रेल्वेगेट उ•ाणपुलानजीक रस्त्यावर पार्किंग केल्या जाणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रहदारी पोलिसांकडून रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकण्यात आला आहे.

Advertisement

सायंकाळी पाचनंतर उद्यमबाग, मच्छे, अनगोळ औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची सुटी होताच शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत तर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहने चालविणेही अवघड होते. त्यातच मागील काही दिवसांपासून उद्यमबाग रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली होती.

उद्यमबाग रोडवर अनेक शोरूम्स, मॉल, तसेच वस्त्रप्रावरणांची दुकाने झाल्याने रस्त्यावरच वाहने लावली जात होती. यामुळे सायंकाळच्यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी वाहनेही लावली जात असल्याने अनेकवेळा नागरिकांकडून तक्रारही करण्यात आली होती. अखेर रहदारी पोलिसांकडून याची दखल घेत रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. वाहनांना लॉक घातले जात असल्याने रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.

 कारवाईपूर्वी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करा

रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी वाहने लावण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईनंतर अद्याप काँक्रिटीकरण झालेले नाही. मागील दीड महिन्यापासून काँक्रिटीकरण झाले नसल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावर वाहने लावत आहेत. त्यामुळे कारवाईपूर्वी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.