Sangli News | तासगांव शहरात बिना परवाना वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई; १५० जण सापडले
तासगांव शहरात नाका बंदी व नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
तासगाव - तासगांव शहरात विना परवाना वाहन चालवणाऱ्यांची संख्या अधिकची झाली आहे. विशेष करून हे प्रमाण महिला, तरूणी, अल्पवयीन मुले-मुली यांच्यात जात असून आठ दिवसात सुमारे १५० महिला, तरूणी, अल्पवयीन मुले-मुली विनापरवाना वाहन चालवताना मिळून आल्या आहेत. ही बाब गंभीर असून संबधित वाहनचालकांनी वाहन चालवण्याचा परवाना घ्यावा असे आवाहन वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आकिब काझी यांनी केले आहे.
तासगांव शहरात वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पोलीस उपनिरीक्षक आकिब काझी यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिला वाहतुक पोलीस व सात पुरूष वाहतुक पोलीस काम करीत आहेत.शहरातील प्रमुख चौका बरोबरच नो पार्किंग मध्ये लावण्यात येणारी वाहने, सम विषम ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून लावण्यात येणारी वाहने याठिकाणी हे वाहतुक पोलीस पथक काम करीत आहेत.
तसेच नाका बंदी वेळी व इतर वेळी बिना परवाना बाहन चालवणारे, मक्यपाशन करून वाहन चालवणारे, ट्रिपल शिट, वाहन चालवणारे, विना नंबर प्लेट वाहन चालवणारे, कर्णकर्णश आवाजात वाहन चालवणारे यांच्यावर हे पथक कारवाई करताना पाहवयास मिळत आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून दंड बसू करण्यात आला आहे.