For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उड्डाणापूर्वी मद्यपान करणाऱ्या वैमानिकावर कारवाई

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
उड्डाणापूर्वी मद्यपान करणाऱ्या वैमानिकावर कारवाई
Advertisement

एअर इंडियाचा वैमानिक कॅनडात ताब्यात

Advertisement

व्हँकुव्हर : कॅनडाच्या व्हँकुव्हर विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. एअर इंडियाच्या एका वैमानिकाला मद्यपान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्लीला जाणाऱ्या विमानाला हा वैमानिक संचालित करणार होता, परंतु उड्डाणापूर्वी हे प्रकरण समोर आल्याने प्रवाशांना विलंबाला सामोरे जावे लागले. विमानतळाच्या ड्यूटी फ्री शॉपमध्ये एका कर्मचाऱ्याने वैमानिकाला मद्य खरेदी करताना पाहिले होते. कर्मचाऱ्याने त्वरित कॅनडाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी वैमानिकाची ब्रेथ एनालायजर टेस्ट केली असता, त्याने मद्यपान केले असल्याचे स्पष्ट झाले, ज्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एअर इंडियाचे एआय186 विमान व्हँकुव्हर येथून दिल्लीसाठी रवाना होणार होते. कॅनडाच्या अधाकाऱ्यांनी वैमानिकाला ताब्यात घेत फ्लाइट रोस्टरमधून हटविले आहे. सुरक्षा नियमांच्या अंतर्गत पर्यायी वैमानिकाला पाचारण करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.