For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंबर प्लेट नसणाऱ्या 126 दुचाकींवर कारवाई

06:38 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
नंबर प्लेट नसणाऱ्या 126 दुचाकींवर कारवाई
Advertisement

सदोष नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवरही कारवाई 

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अनेकजणांनी आपल्या दुचाकीवरील नंबर प्लेट काढल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी नंबर प्लेट नसलेल्या व सदोष नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबवली. यावेळी 126 दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहर व उपनगरात या संबंधीची मोहीम राबविली आहे. नंबर प्लेट शिवाय व सदोष नंबर प्लेट वाहने चालविणाऱ्याविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 177 अन्वये दंडात्मक कारवाई करून 63 हजार दंड वसूल केला आहे. वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, नंबर प्लेट  लावून वाहने चालवावीत, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी

केले.

Advertisement
Tags :

.