इन्सुली -कोठावळेबांध येथील दुभाजक फोडणाऱ्यावर कारवाई करावी
प्रतिनिधी
बांदा
मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली कोठावळेबांध येथे महामार्गविभागाच्या वतीने बंद करण्यात आलेले दुभाजक तेथील हॉटेल व्यावसायिकाने रविवारी फोडले. सदर दुभाजक फोडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. भविष्यात तसे अपघात होता नये म्हणून तेथे अनधिकृत पणे तयार केलेले सर्कल बंद करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. मात्र बंद केलेले ते अनधिकृत सर्कल संबंधित हॉटेल व्यावसायिकाने फोडल्याने पुन्हा अपघात होण्याची शक्यता त्यामुळे महामार्गविभागाच्या अधिकाऱ्यानी संबंधितावर कारवाई करून ते दुभाजक कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी माडभाकर ग्रामस्थांनी केली आहे.अलीकडेच महामार्गावरील अनधिकृत पणे असलेले सर्कल महामार्गाविभागाच्या वतीने बंद करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी इन्सुली माडभाकर येथील महामार्गावरील बंद करण्यात आलेले अनधिकृत सर्कल तेथील हॉटेल व्यावसायिकाने पुन्हा दुभाजक फोडून तयार केले. याठिकाणी ढाबा असून तेथे मोठं मोठे कंटेनर वळून हॉटेल मध्ये जातात. त्या गाड्या वळत असताना मागून येणाऱ्या गाड्यांना त्याचा अंदाज येत नसल्याने तसेच एक्सप्रेस हायवे असल्याने तेथे अपघात होतात. काही वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी एक दुचाकीस्वाराला अपघातात आपला प्राण गमवावा लागला होता.त्यामुळे सदरचा अनधिकृत पणे तयार केलेले सर्कल तात्काळ बंद करून त्या फोडणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी तेथील ग्रामस्थ आपा आंमडोसकर व माडभाकर ग्रामस्थांनी केली आहे.