For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांस वाहतूक वाहनावर कारवाई

10:29 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मांस वाहतूक वाहनावर कारवाई
Advertisement

खानापूर पोलिसांकडून 600 किलो मांस जप्त

Advertisement

गुंजी : मंगळवारी सकाळी गुंजीनजीक विनापरवाना मांस वाहतूक करणाऱ्या बोलेरोवर कारवाई करून 600 किलो 78000 ऊपयाचे मांस जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजीनजीक राष्ट्रीय महामार्गावर खानापूरहून लोंढ्याच्या दिशेने जाणारी महेंद्रा बोलेरो नादुऊस्त होऊन थांबली होती. सदर वाहनातून लाल पाणी गळत असल्याचे पाहून काहींना  गाडीमध्ये गोमांस असल्याचा संशय आल्याने याची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस येणार याची कुणकुण लागताच सदर गाडीच्या चालकाने गाडी सोडून पलायन केले. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये मांस भरलेले आढळून आले. मात्र गाडी चालकाने पलायन केल्याचे निदर्शनास आल्यावर सदर गाडी पोलीस ठाण्यात नेऊन गाडीतील सहाशे किलो मांस जप्त करून गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.