For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलाला मत द्यावयास लावल्याने कारवाई

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुलाला मत द्यावयास लावल्याने कारवाई
Advertisement

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका जिल्हा पंचायत सदस्याने 7 मे या दिवशी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान करावयास लावून त्याच्या मतदानाचा व्हिडीओही प्रसिद्ध केल्याने त्याच्या विरोधात एफआयआर सादर करण्यात आला आहे. तसेच या मतदानकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एक अल्पवयीन मुलगा मतदान करीत आहे, आणि त्याचे वडील या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण करीत आहेत, असा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून तो अनेकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्वरित प्रशासनाकडून या प्रकारची दखल घेण्यात आली. शाहानिशा केल्यानंतर हा प्रकार खरोखरच घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या पंचायत सदस्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

Advertisement

असे मतदान हा गुन्हा

आपले मत अनुमती नसताना दुसऱ्याकडून घालून घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे असे करणाऱ्यास कारावासाची शिक्षाही होऊ शकते. तसेच असा प्रकार करु देणाऱ्या मतदानकेंद्र अधिकाऱ्यांविरोधात आणि कर्मचाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे या प्रकाराशी संबंध असणारे सर्वजण आता अडचणीत सापडले असून त्यांच्यावर अभियोग सादर केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.