For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दसरा सुटीच्या काळात शाळा सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करा

06:25 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
दसरा सुटीच्या काळात शाळा  सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
Advertisement

श्रीराम सेनेची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक सरकारकडून 3 ते 21 ऑक्टोबर या काळात राज्यातील शाळा, महाविद्यालयांना दसरा सुटी जाहीर केलेली असताना काही खासगी शिक्षण संस्था शासनाच्या सुटीच्या आदेशाच्या विरोधात सुटीच्या कालावधीतच शालेय उपक्रम तसेच परीक्षा घेत आहेत. त्यामुळे शासनाने उल्लंघन करणाऱ्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Advertisement

कर्नाटकात पारंपरिक पद्धतीने दसरा उत्सव साजरा होतो. दसरा हा कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक सण आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासोबत तसेच समाजासोबत वेळ घालवून सांस्कृतिक परंपरेची ओळख करून घेता यावी, हा देखील सुटीचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. मात्र सुटीच्या कालावधीत  परीक्षा आणि नियमित शैक्षणिक उपक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर अनावश्यक परीक्षेचा ताण येत आहे.

सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करा

सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून शाळांचे कामकाज सुरू ठेवल्याबद्दल श्रीराम सेनेच्यावतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. जिल्ह्यात किती शाळा सुरू ठेवल्या जात आहेत, याबाबतची माहिती मागवून अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी श्रीराम सेनेचे उत्तर प्रांत राज्य अध्यक्ष रवी कोकितकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.