For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jyotiba Dongar | भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई! जोतिबा चैत्र यात्रेच्या बाजारपेठेत अन्न प्रशासनाचा छापा

12:17 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
jyotiba dongar     भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई  जोतिबा चैत्र यात्रेच्या बाजारपेठेत अन्न प्रशासनाचा छापा
Advertisement

          जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त प्रशासनाचे कडक तपासणी मोहीम

Advertisement

जोतिबा डोंगर : पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे जोतिबाच्याचैत्र यात्रेनिमित्त बाजारपेठेत प्रसाद म्हणून विक्रीला आलेल्या भेसळयुक्त आणि मुदतबाह्य सुमारे २६ हजार रुपये किंमतीचे पेढे आणि आईस्क्रीम विकणाऱ्या टोळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत पेढे आणि आईस्क्रीम नष्ट करून टाकले.

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराची चैत्र पौर्णिमेची यात्रा आज बुधवारी संपन्न होत आहे. या यात्रेत प्रसाद म्हणून विक्रीसाठी आईस्क्रीम, खाद्य पदार्थ आणि पेढ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. या पेढ्यांमध्ये कर्नाटकात उत्पादन झालेले पेढे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले जातात. हे पदार्थ भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे आहेत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Advertisement

या तक्रारीनुसार अन्न प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अन्न प्रशासन विभागाने जोतिबा डोंगरावरील सर्व विक्रेत्यांच्या मालाची तपासणी सुरू केली आहे. यात सुमारे २६ हजार रुपये किंमतीचे पेढे आणि आईस्क्रीम नष्ट करण्यात आल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी विजय पाचपुते यांनी सांगितले. या कारवाईवेळी पेढा आणि कलाकंद यांच्या प्रत्येक पॅकिंगवर उत्पादन तिथी आणि मुदतबाह्य तिथी लिहूनच विक्री करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.