For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

11:30 AM Jun 07, 2025 IST | Radhika Patil
गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावरील खानू येथे गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई केल़ी टेम्पोत एकूण 5 गुरे असल्याची पोलिसांना आढळल़ी या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोमधील चालकासह दोघा संशयितांविऊद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केल़ी राहुल आनंदा सावंत (23) व ऋषीकेश आनंदा सावंत (26, ऱा दोन्ही बोरपाडळे त़ा पन्हाळा जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव गस्त घालण्यात येत होत़ी 5 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास खानू पेट्रोलपंप येथे एक टेम्पो येत असल्याचे पोलिसांना दिसून आल़े या टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता हौद्यामध्ये 5 गुरे बांधलेली दिसली. टेम्पोमधील दोघांजवळ पोलिसांनी चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर ते देवू शकले नाहीत़ तसेच गुरे खरेदीची पावती व वाहतुकीचा करण्याचा परवाना सादर कऊ शकले नाहीत़ या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविऊद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1)()()()()(एच) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(),(),9 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, व केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 चे कलम 125 () प्रमाणे गुन्हा दाखल केला आह़े तसेच 6 लाख ऊपये किंमतीचा टेम्पो व 5 गुरे पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार सावंत, कांबळे, हवालदार सावंतदेसाई, शिपाई पाटील यांनी केल़ी

Advertisement

Advertisement
Tags :

.