For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळूमाफियांवर कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त

03:05 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
वाळूमाफियांवर कारवाई  60 लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

संगमेश्वर : 

Advertisement

तालुक्याच्या करजुवे खाडीपट्ट्यात छुप्या पद्धतीने ड्रेझरद्वारे वाळू उपसा करण्यात येत होता. याची कुणकण लागताच संगमेश्वर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत 300 ब्रास वाळू, 4 डंपरसह 60 लाख 60 हजार ऊपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे धणाणले आहेत.

राजेश रवींद्र चव्हाण (31, रा. डेरवण, चव्हाणवाडी, ता. चिपळूण), विक्रम विलास महाडिक (32, रा. मुरादपूर, शंकरवाडी, ता. चिपळूण), शुभम अजित चव्हाण, (23, रा. कळंबुशी, अलेटीवाडी, ता. संगमेश्वर), डंपर (एम. एच. 09 टी.सी. 0158) चालक (नाव-गाव माहित नाही) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील करजुवे येथे गेले काही दिवस चोरट्या वाळूची वाहतूक सुरू होती. शासनाचा महसूल बुडवून छुप्या पद्धतीने वाळू व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी संगमेश्वरचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी मंगळवारी मध्यरात्री आपल्या सहकाऱ्यांसह करजुवे गाठले. या ठिकाणी धाड टाकताच चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात ओली वाळू भरलेले 4 डंपर आढळले. तसेच 300 ब्रास वाळू उपसा केलेला दिसून आला. असा एकूण 4 डंपरसह 60 लाख 60 हजार मुद्देमाल हस्तगत केला.

Advertisement

  • काहीजण फरार

वाळूमाफिया गेले आठवडाभर करजुवे खाडीत छुप्या पद्धतीने मध्यरात्री ड्रेझरच्या सहाय्याने वाळू काढत असल्याची चर्चा या परिसरात होती. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी चोरट्या वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी करजुवे गाठले. पोलिसांची कुणकुण लागताच ड्रेझरच्या सहाय्याने वाळू उपसा करणारे चोरटे खाडीतून फरार झाले.

Advertisement
Tags :

.