महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिशंकर यांच्या कन्येच्या एनजीओवर कारवाई

06:56 AM Mar 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एफसीआरए परवाना निलंबित

Advertisement

. वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या यामिनी अय्यर यांच्या नेतृत्वाखाली चालविल्या जाणाऱया थिंक टँकचा एफसीआरए परवाना निलंबित करण्यात आला आहे. या थिंक टँकचे नाव सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आहे. या एनजीओकडून नियमांचे उल्लंघन केले जात होते असे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

एफसीआरएच्या नियमांच्या उल्लंघनामुळे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचा एफसीआरए परवाना निलंबित करण्यात आला आहे. यापूर्वी देखील या थिंक टँकसंबंधी प्राप्तिकर विभागाने सर्वेक्षण केले होते.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चकडून 2016 मध्ये एफसीआरए परवान्याचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना काळादरम्यान केंद्र सरकारकडून थिंक टँकच्या स्वरुपात काम करत असलेल्या या एनजीओच्या एफसीआरए परवान्याची मुदत वाढविली होती. एफसीआरए परवान्याचे नुतनीकरण 2021 मध्ये होणे अपेक्षित होते.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चला फोर्ड फौंडेशन समवेत अनेक देशांकडून निधी मिळाला आहे. या एनजीओने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोप आहे. तर तीस्ता यांच्या सबरंग या एनजीओचा परवाना गृह मंत्रालयाने 2016 मध्येच रद्द केला होता.

एफसीआरए परवाना निलंबित झाल्याने सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चला आता विदेशातून निधी मिळविता येणार नाही. या एनजीओला बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशन, युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया, वर्ल्ड रिसोर्सेज इन्स्टीटय़ूट आणि डय़ूक युनिव्हर्सिटी यांच्याकडून निधी मिळाला होता. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च ही स्वयंसेवी संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त आहे. या संस्थेला इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चकडूनही निधी प्राप्त होतो.

एफसीआरए अंतर्गत मिळालेल्या निधीबद्दल एनजीओकडून गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण मागितले होते. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चच्या वेबसाइटनुसार हा एनजीओ 1973 पासूनच भारताचा आघाडीचा पॉलिसी थिंकटँक आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article