कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवाईनंतरही एलईडी मासेमारी सुरुच, मत्स्य विभागाची स्पीडबोट गेली कुठे?

01:37 PM Apr 23, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

अवैध एलईडी मासेमारी नौकांवर कारवाई झाली असली तरी एलईडी मासेमारी बंद झालेली नाही

Advertisement

दापोली : मत्स्यविकास मंत्री नीतेश राणे यांनी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध एलईडी मासेमारी नौकांवर कारवाई झाली असली तरी एलईडी मासेमारी काही पूर्णत: बंद झालेली नाही. सोमवारी रात्री दापोली तालुक्यातील हर्णै बंदरासमोर एलईडी दिव्यांचा मोठा प्रकाशझोत किनाऱ्यावरून पहावयास मिळत होता. स्थानिक मच्छीमारांकडून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मत्स्य विभागाची स्पीड बोट गेली कुठे, असा संतप्त सवाल मच्छीमारांमधून उपस्थित केला जात होता.

Advertisement

दिवसेंदिवस वाढत्या अवैध एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार मत्स्यदुष्काळाला सोमोरे जात आहेत. कारण एलईडी दिव्यांच्या साह्याने पर्ससीन मासेमारी करून लहानमाशांसह मोठे मासे काही तासातच पकडले जात आहेत. अवैध एलईडी नौका व पर्ससीन नेट नौकांची संख्या आता वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कारण या नौका तळागाळातील मासे घेवून जातात. हे असेच सुरू राहिल्यास स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल, अशा प्रतिक्रिया मच्छीमारांतून उमटत आहेत. एलईडी मासेमारीविरोधात कडक कारवाईचे आदेश मत्स्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तरीदेखील एलईडी नौकाधारक मत्स्य विकास मंत्र्यांच्या भूमिकेलाच आव्हान देत आहेत. मग सर्वसामान्य मच्छीमारांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा सवाल मच्छीमारांमधून उपस्थित केला जात आहे.

योग्य ती कारवाई करू - मत्स्य विभाग

दरम्यान, याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकारी दिप्ती साळवी यांच्याकडे संपर्क साधला असता यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
# nilesh rane # tarun bharat#Dapoli#kokan#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediafishingLED lights
Next Article