For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ई-रिक्षा बंद करणाऱ्या ॲ‍ॅपवर कारवाई

06:41 AM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
ई रिक्षा बंद करणाऱ्या ॲ‍ॅपवर कारवाई
Advertisement

गूगल प्ले स्टोअरवरुन हटविले बीएटी-बीएमएस अॅप : सरकारने उचलले पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था? नवी दिल्ली

सरकारच्या निर्देशांनतर ई&-रिक्षा बंद करणारे अॅप बीएटी बीएमएसअॅपला गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून हटविण्यात आले आहे. या अॅप्सचा वापर ई&-रिक्षेला काही अंतरावरून बंद करण्यासाठी केला जात होता, असा आरोप आहे. सुरक्षा आणि संभाव्य गैरवापराची शक्यता पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी यापुढेही जारी राहणार आहे.

Advertisement

सोशल मीडियावर बीएटी बीएमएस अॅपशी निगडित अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. या अॅपद्वारे काही लोक ई&-रिक्षा काही अंतरावरूनच बंद करत होते, ज्यामुळे अनेक चालकांना आर्थिक नुकसान झेलावे लागले होते. ई&-रिक्षा अचानक बंद पडण्याच्या घटना आणि चालकांच्या वाढत्या तक्रारीनंतर या प्रकरणाने गंभीर रुप धारण केले होते.

काय आहे बीएटी बीएमएस अॅप

तुलनेत स्वस्त ई-रिक्षांमध्ये लिथियम-आयन बॅटरी लावलेली असते. या बॅटऱ्यांमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (बीएमएस) असते, जी बॅटरीच्या स्थितीवर नजर ठेवते.

बॅटरीत किती चार्ज शिल्लक आहे, ती अधिक तप्त होत आहे आहे का आणि एखादा तांत्रिक बिघाड आहे का हे या सिस्टीमकडून निदर्शनास आणून दिले जाते. काही स्वस्त आणि खासकरून चीनमध्ये निर्मित बॅटऱ्यांमध्ये या बीएमएस सोबत ब्ल्यूटूथची सुविधा दिली जाते. या ब्ल्यूटूथवर पासवर्ड किंवा सुरक्षा

लॉक लावण्यात न आल्यास आसपास उपस्थित कुठलाही व्यक्ती स्वत:च्या मोबाइलद्वारे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. बीएटी-बीएमएस अॅप याच ब्ल्यूटूथ कनेक्शनचा वापर करत बॅटरीच्या सिस्टीमपर्यंत पोहोचू शकते. ज्याला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी जोखीम मानण्यात येत आहे.

ब्ल्यूटूथ कनेक्शनचे रेंज

ज्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये सुरक्षा लॉक नसते, त्यात ब्ल्यूटूथची रेंज 10-15 मीटरपर्यंत असते. याचा अर्थ कुठलाही व्यक्ती ब्ल्यूटूथद्वारे बॅटरी सिस्टीमशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू शकतो. हा व्यक्ती त्याच्याशी कनेक्ट होत बॅटरीचा डिस्चार्ज बंद करू शकतो, अशास्थितीत ई-रिक्षा बंद होते.

कमी किमतीची बॅटरी

दर्जेदार आणि ब्रँडेड कंपन्यांच्या बॅटऱ्यांमध्ये मजबूत सुरक्षा आणि एन्क्रिप्शन सिस्टीम असते, याचमुळे त्यांच्या बाबतीत अशाप्रकारची जोखीम नसल्याचे मानले जाते. ही जोखीम प्रामुख्याने कमी किमतीच्या आणि नंतर लावण्यात आलेल्या (आफ्टरमार्केट) बॅटऱ्यांमध्ये दिसून येते आहे, ज्यांचा वापर मोठ्या संख्येत ई-रिक्षांमध्ये केला जातो.

सरकार सतर्क

हे अॅप लिथियम बॅटरीच्या

बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमला मॉनिटर करण्यासाठी निर्माण करण्यात आले होते. परंतु याचा काही लोक गैरवापर करत आहेत. ज्या ई&-रिक्षामध्ये ब्ल्यूटूथ सपोर्टयुक्त असुरक्षित बीएमएस आहे, ते वाहनच प्रभावित होऊ शकते. अशाप्रकरणांमध्ये कुठलाही व्यक्ती बॅटरीशी कनेक्ट होत त्याला तात्पुरत्या स्वरुपात डिसेबल करू शकतो. आता या समस्येवरून सरकार आणि सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

सरकारने उचललेली पावले

ई-रिक्षा बंद पडल्याच्या घटनांप्रकरणी दिल्ली सरकारने चौकशीचे निर्देश दिले. जर कुणी जाणूनबुजून अशाप्रकारचे कृत्य करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच बॅटरी आणि ई-रिक्षा उत्पादकांना सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात येत आहे.

चालकांना सूचना

?ई-रिक्षामध्ये ब्ल्यूटूथ आधारित लिथियम

बॅटरी असल्यास त्याचा उत्पादक किंवा डिलरशी संपर्क साधून बीएमएस सुरक्षित आहे का हे तपासावे.

?बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचा पासवर्ड बदलणे किंवा फर्मवेअर अपडेटचा

ऑप्शन उपलब्ध असल्यास तो त्वरित लागू करण्यात यावा.

?अनोळखी व्यक्तीला वाहनातील बॅटरीच्या सेटिंग्सपर्यंत पोहोचू देऊ नका आणि केवळ अधिकृत अॅपचाच वापर करण्यात यावा.

?बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये अॅप कंट्रोल लॉक किंवा रिमोट कंट्रोल लॉकचा पर्याय असेल तर तो चालकांनी त्वरित सक्रीय करावा.

?ज्या चालकांना ब्ल्यूटूथ

मॉनिटरिंगची आवश्यकता नाही, ते तं ज्ञांच्या मदतीने ब्ल्यूटूथ मॉड्यूल बंद करवून घेऊ शकतात.

Advertisement

.