For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अच्युतादित्य-अर्जुन पहिल्याच फेरीत पराभूत

06:20 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अच्युतादित्य अर्जुन पहिल्याच फेरीत पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, मार्खम

Advertisement

अच्युतादित्य राव दो•ावरपू आणि पोचना अर्जुन या भारतीय पुरूष दुहेरी जोडीला कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना सरळ गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. मंगळवारी रात्री झालेल्या बीडब्ल्यूएफ सुपर 300 स्पर्धेच्या सलामीच्या फेरीत, या भारतीय जोडीला पाचव्या मानांकीत आणि यजमान देशाच्या केविन ली व टाय अलेक्झांडर लिंडेमन यांच्याकडून अवघ्या 23 मिनिटांत 9-21, 7-21, असा पराभव स्वीकारावा लागला. बुधवारी भारताच्या मोहिमेला वेग येईल. यात चौथ्या मानांकीत किदांबी श्रीकांतची पुरूष एकेरीतील लढत मलेशियाचा पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता ली झी जिया याच्याशी होईल तसेच आकर्षी कश्यप, देविका सिहाग, अनमोल खरब, तरुण मन्नेपल्ली, सनीथ दयानंद आणि तान्या हेमंत हे खेळाडूही आपापल्या मोहिमेला सुरवात करतील.

Advertisement
Advertisement
Tags :

.