आचरा इंग्लिश मिडीयम स्कूलचे किक बॉक्सिंग स्पर्धेत यश
विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत 2 विद्यार्थ्यांची निवड
आचरा| प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 19 वर्षाखालील मुलगे गटातून अथर्व निलेश भोसले व 17 वर्षाखालील मुली गटाततून ॲलिसिया वॉलविन फर्नांडिस हिने प्रभावी खेळ सादर करत विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत स्थान मिळविले आहे.या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलगे गटात अथर्व निलेश भोसले यांनी उत्कृष्ट आक्रमण व कौशल्यपूर्ण बचाव करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आपली दमदार कामगिरी सादर केली. तर 17 वर्षाखालील मुली गटातून ॲलिसिया वॉलविन फर्नांडिस हिने तिच्या वेगवान तंत्र, शारीरिक क्षमता आणि चिवटपणाच्या जोरावर उल्लेखनीय विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत स्थान मिळवत पुढील टप्प्यासाठी पात्रता मिळवली असून शाळेचा आणि पालकांचा अभिमान वाढविला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस, तसेच संस्थेचे अध्यक्ष निलेश सरजोशी खजिनदार परेश सावंत, सदस्य सुरेश गावकर, मंदार सांबारी, दिलीप कावले,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.