For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा- देवगड बसला अपघात

07:28 PM Dec 30, 2023 IST | अनुजा कुडतरकर
आचरा  देवगड बसला अपघात
Advertisement

रस्ता सोडून बस घराला धडकली

Advertisement

चालक ,वाहकासह पॅसेंजर जखमीस्थानिकांनी

धावपळ करत आतील लोकांना उपचारासाठी हलवले

Advertisement

आचरा प्रतिनिधी

आचरा येथून दुपारी दोनच्या सुमारास खुडी मार्गे देवगडला जाणारया गाडीच्या वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एसटी बस रस्ता सोडून खाली उतरत पोयरे गोंदापूर येथील संजय सावंत यांच्या घराला धडकली. सदर घटना दुपारी २.३०च्या सुमारास घडली. या एसटी बसमधून सुमारे 22 प्रवासी प्रवास करत होते. यात शाळेतून घरी येणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या जास्त होती. सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र , गाडी चालक यात गंभीर जखमी झाला होता. त्याला आचरा वैद्यकीय केंद्रातून ओरोस येथे हलविण्यात आले.गाडीच्या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दिपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव,किशोर पालव, पोयरे उपसरपंच समिर तावडे, मंगेश पालव यांसह पंधरा सोळा ग्रामस्थांनी धाव घेत बस मध्ये अडकलेल्या वाहकाला लोखंडी अवजाराचा वापर करून दरवाजा तोडत बाहेर काढले.घटनेची खबर कळताच देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार स्वप्नील ठोंबरे यांनी गोंदापूर येथे येत घटनेचा पंचनामा केला. तर देवगड एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी धाव घेतली होती. अपघातानंतर गाडीतील प्रवाशांना नातेवाईकांनी वाहनाने घरी नेल्यामुळे अन्य जखमींबाबत माहिती समजू शकली नाही.

Advertisement
Tags :

.