विभागीय क्रीडास्पर्धेत लोकोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
वार्ताहर/ कणकुंबी
गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये लोकोळी येथील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दि. 3 व 4 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये मुलींच्या संघाने थ्रो बॉल व व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुलांच्या संघानेदेखील थ्रो बॉल प्रथम व व्हॉलीबॉलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारात भालाफेक- रुचिका पाटील प्रथम, सानिका चव्हाण तृतीय, तिहेरी उडी- समीक्षा पाटील प्रथम, संपूर्णा पाटील द्वितीय, अडथळा शर्यत-समीक्षा पाटील प्रथम, नफिशा सनदी तृतीय. हॅमर थ्रो-तनिषा पाटील तृतीय, बुद्धिबळ स्पर्धा-कोमल गुरव प्रथम, विद्या गोविंद चव्हाण प्रथम, योग- सुजल चव्हाण, वैभवी मा. पाटील, नफिसा सनदी प्रथम, कुस्ती-40 कि. वजन गटात सुजल चव्हाण प्रथम, 43 किलो रुतिका तळवार, 49 कि. नफिसा सनदी, 53 कि. रुचिका पाटील, 65 कि. सानिका चव्हाण, 69 कि. तनिषा पाटील, 73 कि. ज्ञानेश्वरी पाटील सर्वांनी प्रथम क्रमांक मिळविले आहेत.
मुलांच्या गटात चालणे- यश पाटील द्वितीय, मारुती पाटील तृतीय, हॅमर थ्रो- संभाजी वालेकर द्वितीय, अडथळा शर्यत -मारुती पाटील द्वितीय, थाळीफेक -निकेत पाटील तृतीय, तिहेरी उडी -गणेश पाटील तृतीय, कुस्ती-51 कि. गट संभाजी वालेकर प्रथम, गणराज पाटील 71 कि प्रथम, बाळकृष्ण पाटील 80 कि. प्रथम योग-चाळोबा कामती, गणेश पाटील प्रथम क्रमांक. या सर्व विद्यार्थ्यांचे चांगळेश्वरी संस्थेच्यावतीने व परिसरात अभिनंदन होत आहे.