डीवायईएसच्या खेळाडूंचे यश
10:43 AM Oct 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : अस्मिता खेलो भारतीय राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएसच्या तीन खेळाडूंनी एक रौप्य व दोन कास्य पदक पटकावित यश संपादन केले आहे. युवजन क्रीडा खाते व युवा सबलीकरण अस्मिता खेलो राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस च्या ज्युडो खेळाडू अलिया मुल्तानी हिने 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारीत रौप्यपदक पटकाविले. 63 किलो गटात संजना शेट कास्य पदक तर 70 किलो वजनी गटात राधिका डुकरेने कास्यपदक पटकाविले. या तिन्ही खेळाडूंचे युवजन क्रीडा खात्यातर्फे खास गौरव करण्यात आला. तर ज्युडो प्रशिक्षक राहिणी पाटील कुतुजा मुल्तानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article