For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आबा-हिंद क्लबच्या जलतरणपटूंचे यश

09:55 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूंचे यश
Advertisement

बेळगाव : नुकत्याच दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करताना बेंगळूर विभागाला सर्वसाधारण जेतेपद मिळवून दिले. चिन्मय बागेवाडी केंद्रीय विद्यालय 2 याने 19 वर्षाखालील मुलांच्या गटात 50 मी. फ्रीस्टाइल व 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 2 सुवर्ण, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य, आदी शिरसाट केंद्रीय विद्यालय 2 याने 17 वर्षाखालील गटात 400 मी. आयएममध्ये रौप्य तर 200 मी.  ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कास्य, वैजनाथ सोनपणावर केवी 2 च्या विद्यार्थ्याने 4×100 मी. मिडले रिले व 4×100 मी. फ्रीस्टाईल रिलेमध्ये एक सुवर्ण व एक रौप्य, अर्णव कुलकर्णी केंद्रीय विद्यालय 2 याने 17 वर्षाखालील गटात डायव्हिंगमध्ये 1 मी. स्प्रिंगबोर्डमध्ये सुवर्ण व 3 मी. स्प्रिंग बोर्डमध्ये रौप्य पदक पटकाविले. याचबरोबर मयुरेश जाधव व प्राची कदम केंद्रीय विद्यालय 2 यांनी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन चांगली कामगिरी केली. चिन्मय बागेवाडी, आदी शिरसाठ व अर्णव कुलकर्णी यांची नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते व रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन तर मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलभते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लागत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.