मोठं व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्वाचे : विशाल परब
आरोस बाजार आयोजित दिपावली शो टाईमचे उद्धाटन
न्हावेली / वार्ताहर
मोठं व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्वाचे आहे.दांडेलीसारख्या छोट्या गावातून आज दोन पोलीस निर्माण झाले.येथील मुले शासकीय नोकरीत लागली आणि त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले.हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे.युवकांची फौज गावातून निर्माण झाली पाहिजे.यासाठी जे काय करायचं असेल ते करण्यासाठी माझी तयारी आहे.दांडेली गावातील लोकांनी मला मदतीची केव्हाही हाक मारा मी सदैव तुमच्या पाठीशी विशाल परब म्हणून उभा आहे.असं भावनिक आवाहन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.
दांडेली येथील जय हनुमान मित्र दांडेली आरोस बाजार आयोजित दिपावली शो टाईमच्या उद्धाटनप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल परब व्यासपीठावर बोलत होते.या दिपावली शो टाईमचे दिप प्रज्वलन करुन उद्धाटन विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर योगेश नाईक,जेष्ठ नागरिक संजू पांगम माजी सरपंच दादा पालयेकर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.