For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी माध्यमिक आमटे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

10:40 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारी माध्यमिक आमटे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश
Advertisement

वार्ताहर/जांबोटी

Advertisement

जांबोटी विभागीय (झोनल) क्रीडास्पर्धा ओलमणी हायस्कूलच्या क्रीडांगणावर पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जांबोटी भागातील आठ-दहा माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. सांघिक स्पर्धा - थ्रो बॉल - मुलांचा व मुलींचा गट प्रथम, कबड्डी -मुलांचा व मुलींचा गट द्वितीय क्रमांक, व्हॉलीबॉल खो-खो मुलांचा गट द्वितीय क्रमांक. वैयक्तिक स्पर्धा - धावणे - परशराम सावंत 100 मी., 200 मी., 400 मी. प्रथम क्रमांक. शुभम गावडे 800 मी. प्रथम, महादेव गावडे 1500 मी. द्वितीय, सागर गावडे 3000 मी. द्वितीय, कृष्णा बेटणेकर 400 मी. द्वितीय, थाळीफेक - लक्ष्मण सुतार द्वितीय. मुलींच्या गटांमध्ये 4×100 रिले प्रथम तर मुलांचा 4×100 मी. रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना सरकारी माध्यमिक विद्यालय आमटे शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. घोरपडे, शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच सी. आर. तडकोड, एस. पी. भाटे या सर्व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.