For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ketan Agrawal Murder "तर आमच्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या" केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचे आई- वडिल असं का म्हणाले?

04:57 PM Jun 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ketan agrawal murder  तर आमच्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या  केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचे आई  वडिल असं का म्हणाले
Advertisement

पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणात आता सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. काही दिवसांवर लग्न आलेलं असताना सियाने प्रियकर चेतन चौधरीसोबत कट रचून भावी पती केतन अग्रवालची लोहगडावरुन ढकलून हत्या केली. सुरुवातीचा अपघाताचा बनाव केलेली ही हत्या पोलिसांच्या तपासात उघड झाली. 

Advertisement

केतनच्या हत्येनंतर त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने देशभर मोठी खळबळ माजली. मुळातच उद्योगपती कुटूंबातील तरुणांमध्ये इतकी विकृती कुठून येते हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिला. या घटनेवर केतनचे वडिल व्यक्त झाले आणि त्यांनी सियाला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दुसऱ्या बाजूला सियाच्या आई वडिलांनीही या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देत आम्ही सियाचा प्रियकर असणाऱ्या चेतनला ओळखतही नव्हतो असं सांगितलं तर आता सियाच्या आईनेही आपल्या मुलीवर राग व्यक्त करणारी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

सियाची आई म्हणाली

Advertisement

"यामध्ये जो कोणी दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, मग माझी मुलगी का असेना. माझ्या मुलीचा दोष असेल तर माझ्या मुलीला लोहगडावर केतनला जिथून ढकलून दिले होते तिथूनच ढकला, असे सियाची आई पूजा गोयल यांनी म्हटले

"मी आजपर्यंत चेतन चौधरी याचा चेहरा पाहिलेला नाही. मी त्याला कधी भेटलो किंवा त्याच्याशी कधी बोललोही नाही. तो कधी घरीही आला नव्हता. किंबुहान आम्ही कधी सियाच्या तोंडून त्याचं नावंही ऐकले नव्हते, असेही सिया गोयल हिच्या वडिलांनी स्पष्ट केले. सियाच्या वडिलांनी केतन अग्रवाल याच्या कुटुंबाबत बोलताना म्हटले की, ते चांगले आणि संस्कारी लोक आहेत.

केतनच्या वडिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

या हादरवून टाकणाऱ्या घटनेने मृत केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना अग्रवाल म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती केली आहे की, आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलंय की, हे प्रकरणात मी स्वत: जातीने लक्ष घालेल आणि फास्ट ट्रॅकवर घेऊन येण्याचा प्रयत्न करू.
मला मिळालेल्या माहितीनुसार, एआयटी चौकशी लावली गेली आहे, असं विशाल अग्रवाल यांनी म्हटलं आहे. आवडत नव्हता तर लग्न करायचं नव्हतं तसं सांगायला हवं होतं. पोराला मारायची काय गरज होती? असा सवाल देखील विशाल अग्रवाल यांनी विचारला आहे.

सियाचे वडील भावूक

आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. देवीचंद  हे अनेकदा आमच्या ड्रायफुटचा व्यवसाय असणाऱ्या दुकानात यायचे, खूप सामान घेऊन जायचे. ते स्वभावाला खूप चांगले होते. या घटनेमुळे आम्ही एका चांगल्या कुटुंबाशी नातेसंबंध सोडण्याची संधी आणि एक मुलगा गमावला आहे. मला या पलीकडे काही बोलायचे नाही, असे सिया गोयल हिच्या वडिलांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.